शिकागो अमेरिकेच्या इलिनॉय राज्यामधील सर्वात मोठे व अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. लेक मिशिगनच्या किनारी वसलेल्या या शहराची वस्ती सुमारे २७ लाख आहे. शिकागो महानगराची वस्ती अंदाजे ९७,००,००० असून ही लोकसंख्या इलिनॉय, विस्कॉन्सिन व इंडियाना राज्यांमध्ये पसरलेली आहे.